Al-what-is-thyroid

थायरॉईड हा आजार नेमका आहे तरी काय?

Al-what-is-thyroid

 

दिवसभर थकवा वाटतोय, केस गळत आहेत, वजन वाढत चाललंय, झोप येत नाही, चिडचिड होते…या सगळ्या तक्रारी आपण बहुतेक वेळा ‘सामान्य’ समजून दुर्लक्षित करतो. पण लक्षात ठेवा, शरीर अशा सूचनांद्वारे काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतंय. 

अशा पद्धतीने लक्षणांकडे दुर्लक्ष करणं, हा एक धोकादायक दृष्टिकोन ठरतो, कारण हे थायरॉईड ग्रंथीच्या असंतुलनाचं प्राथमिक संकेत असू शकतात. चला तर मग समजून घेऊया, थायरॉईड हा आजार नेमका काय आहे?

थायरॉईड हा फक्त एक ‘गळ्याजवळील ग्रंथीचा त्रास’ नसून, तो आपल्या संपूर्ण शरीरव्यवस्थेच्या नियंत्रणात भूमिका बजावणारा एक हार्मोनल आजार आहे. शरीरातील ऊर्जा, चयापचय, हृदयगती, मेंदूची कार्यक्षमता, मासिक पाळी, वजन नियंत्रण या सगळ्या क्रिया थायरॉईड हार्मोन्सवर अवलंबून असतात. त्यामुळे जर हे हार्मोन्स कमी-जास्त झाले, तर त्याचे परिणाम शरीरभर जाणवतात.

पण याचं विशेष म्हणजे थायरॉईडच्या लक्षणं सुरुवातीला बारीकसारीक वाटतात, त्यामुळे लोक याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. आणि तिथेच चूक होते. योग्य निदान आणि जीवनशैलीत योग्य बदल केल्यास, थायरॉईडवर सहज नियंत्रण मिळवता येतं. पण त्यासाठी आधी त्याला ओळखणं आणि समजून घेणं आवश्यक आहे.

थायरॉईड म्हणजे नेमकं काय?

थायरॉईड हे नाव आपण अनेकदा ऐकतो, आणि आता तर अनेक घरांमध्ये या शब्दाचा रोजच्या संभाषणात वापर होतो. वजन वाढणं, थकवा जाणवणं, झोपेच्या तक्रारी, मासिक पाळीतील गोंधळ यांसारख्या अनेक समस्या यामागे थायरॉईड असतो, असं डॉक्टर सांगतात. पण हा थायरॉईड नेमका काय आहे, याचा विचार केला तर – अनेकांना फक्त औषध घेण्याइतकंच त्याचं ज्ञान असतं.

आपल्यापैकी बरेच जण फक्त टेस्ट रिपोर्टवरचा TSH पाहतात, गोळी घेतात आणि पुढं निघून जातात. पण खरंतर थायरॉईडचं कार्य, त्याचा शरीरावर होणारा परिणाम आणि त्यामागची साखळी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हा आजार केवळ एका चाचणीपुरता मर्यादित नसतो, तो तुमच्या संपूर्ण जीवनशैलीशी जोडलेला असतो.

थायरॉईडचा त्रास म्हणजे फक्त “एक गोळी रोज घेण्याचा विषय” नाही. जर आपण या समस्येच्या मुळापर्यंत गेलो, त्याचं मूळ समजून घेतलं, शरीराला समजून घेतलं, तर तो नियंत्रित करणं, आणि काही वेळा नैसर्गिकरित्या सुधारणं देखील शक्य होतं. यासाठीच आपण थायरॉईडबद्दलचा हा प्रवास केवळ वैद्यकीय भाषेत न ठेवता, सोप्या आणि वास्तवदर्शी पद्धतीनं समजून घेणार आहोत.

थायरॉईड ग्रंथी म्हणजे काय?

थायरॉईड हा गळ्याच्या पुढील बाजूस असलेला एक लहानसा, बटरफ्लाय शेपचा ग्रंथी आहे, जो शरीरातील चयापचय (metabolism), उर्जा निर्मिती, आणि अनेक शारीरिक क्रिया नियंत्रित करतो.

आपल्या शरीरात दोन प्रकारच्या ग्रंथी असतात:

एंडोक्राईन ग्रंथी – ज्या हार्मोन्स थेट रक्तप्रवाहात सोडतात. (थायरॉईड, पिट्युटरी, अ‍ॅड्रिनल्स इ.)
एक्सोक्राईन ग्रंथी – ज्या रक्ताबाहेर स्राव सोडतात, जसे घाम, अश्रू, लाळ इत्यादी.

थायरॉईड ग्रंथी ही एंडोक्राईन सिस्टमचा भाग आहे. ती थायरॉक्सिन (T4) आणि ट्राय आयोडोथायरोनिन (T3) हे हार्मोन्स तयार करते. हे हार्मोन्स थेट रक्तप्रवाहात मिसळून संपूर्ण शरीरावर प्रभाव टाकतात.

 TSH, T3 आणि T4 यांचं नातं काय?

1) TSH – थायरॉईडसाठी मेंदूचा सिग्नल

TSH (Thyroid Stimulating Hormone) हा हार्मोन आपल्या मेंदूमधील पिट्युटरी ग्रंथीमध्ये तयार होतो. याचं मुख्य काम म्हणजे थायरॉईड ग्रंथीला सिग्नल देणं  T3 आणि T4 तयार करण्यासाठी. जर T3 आणि T4 कमी असतील, तर TSH वाढतो आणि त्यांचं उत्पादन वाढवतो. म्हणजेच TSH हा थायरॉईडच्या कामगिरीचा निर्देशक आहे.

2) T3 – परिणाम करणारा सक्रिय हार्मोन

T3 (Triiodothyronine) हा थायरॉईड हार्मोन शरीराच्या कार्यक्षमतेवर थेट प्रभाव टाकतो. पचन, ऊर्जा, मानसिक स्थैर्य आणि त्वचेचं आरोग्य यांसारख्या अनेक गोष्टी T3 मुळे प्रभावित होतात. तो प्रमाणाने कमी प्रमाणात तयार होतो, पण त्याचा प्रभाव अधिक असतो.

3) T4 – साठवणूक स्वरूपाचा हार्मोन

T4 (Thyroxine) हा थायरॉईड ग्रंथीत तयार होणारा मुख्य हार्मोन आहे. तो थेट शरीरावर फारसा परिणाम करत नाही, पण शरीरात तो T3 मध्ये रूपांतरित होतो, आणि तिथून पुढचा प्रभाव घडतो. म्हणून T4 ही T3 साठी एक सुरुवात मानली जाते.

थायरॉईडचे प्रकार: Hypothyroidism vs. Hyperthyroidism

Hypothyroidism ही अशी स्थिती असते जिथे शरीरातील चयापचय क्रिया मंदावतात. यात TSH वाढलेला असतो, पण T3 आणि T4 हे हार्मोन्स कमी प्रमाणात असतात. याचा परिणाम म्हणजे सतत थकवा, वजन वाढणं, त्वचा कोरडी होणं, आणि थंडीची जास्त संवेदनशीलता. ही लक्षणं अनेकदा इतर कारणांसारखी वाटतात, त्यामुळे रुग्ण ते वेळीच ओळखत नाहीत.

Hyperthyroidism यामध्ये T3 पातळी जास्त असते, TSH सामान्य किंवा अगदी कमी असतो, आणि T4 चा स्तर अस्थिर राहतो. यामुळे शरीराची क्रिया उलटी म्हणजे जास्त उष्णता निर्माण होणं, बेचैनी, झोपेचा अभाव, आणि वजन झपाट्याने घटणं अशी लक्षणं दिसतात. हे लक्षणं शरीराला थकवून टाकतात आणि मानसिक अस्वस्थता वाढवतात.

 थायरॉईडची लक्षणं ओळखणं का महत्त्वाचं?

थायरॉईड असंतुलनामुळे खालीलप्रमाणे लक्षणं दिसून येतात:

थकवा आणि उत्साहाचा अभाव
वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे
त्वचेचा कोरडेपणा
केसगळती
मासिक पाळीत अनियमितता
चिडचिड आणि मानसिक अस्वस्थता
अपचन, अ‍ॅसिडिटी आणि झोपेची समस्या
थायरॉईडची लक्षणं – आपण दुर्लक्ष का करतो?

“थकवा येतोच ना कामानं!”, “केस सगळ्यांचेच गळतात हल्ली!”, “वजन वाढलंय? जरा डाएट कर!” – ही वाक्यं आपल्याला ओळखीची वाटतात ना? पण अशा बोलण्यामागे एक मोठा धोका लपलेला असतो — लक्षणांना सामान्य समजून मूळ कारणांकडे दुर्लक्ष करणं. बरेचदा थायरॉईडसारखा गंभीर हार्मोनल असंतुलन याच सामान्य लक्षणांमधून सुरुवात करतो. त्यामुळे शरीर सतत सिग्नल देत असतं, पण आपण ते ऐकायला तयार नसतो.

थोडक्यात सांगायचं तर, जेव्हा एकच त्रास वारंवार आणि सातत्याने जाणवतो, तेव्हा त्याकडे “सामान्य” नजरेने न पाहता – त्यामागचं शारीरिक किंवा हार्मोनल कारण समजून घेणं गरजेचं असतं. विशेषतः महिलांमध्ये थकवा, मासिक पाळीत बदल, वजनातील चढ-उतार ही लक्षणं खूप कॉमन मानली जातात – पण ती नेहमीच सामान्य नसतात.

थायरॉईड होण्यामागची कारणं
मानसिक ताण (Stress) – 

विशेषतः महिलांमध्ये, overthinking आणि emotional load यामुळे मेंदूतील hypothalamus वर परिणाम होतो.
झोपेच्या वेळा अस्ताव्यस्त असणे
खाण्याच्या वेळा चुकीच्या असणे
पोषणतत्त्वांची कमतरता (विशेषतः Selenium, Zinc, Vitamin D)
अतिप्रमाणात जंक फूडचे सेवन – त्यामुळे शरीरात toxins जमा होतात.
पचनक्रियेतील बिघाड – त्यामुळे पोषणशक्ती कमी होते.
 थायरॉईडवर आहार, दिनचर्या आणि उपाय
सकस, घरगुती आहार घ्या
Selenium, Zinc, आयोडिन युक्त पदार्थांचा समावेश करा
वेळेवर जेवा, झोपा आणि शरीराला विश्रांती द्या
डिजिटल डिटॉक्स करा
थोडा वेळ ध्यान, योगासन, प्राणायाम यासाठी ठेव

निष्कर्ष:

थायरॉईड हा केवळ एक ग्रंथीचा त्रास नसून संपूर्ण शरीराच्या कार्यक्षमतेवर प्रभाव टाकणारा हार्मोनल आजार आहे. त्यामुळे त्याची लक्षणं ओळखून वेळेवर उपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे. जीवनशैलीत बदल, योग्य आहार आणि मानसिक आरोग्य यांची योग्य सांगड घातल्यास थायरॉईडवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.

अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी आपल्या YouTube चॅनलवरील Podcast Episode 1 नक्की ऐका! पाहण्यासाठी क्लिक करा: थायरॉईड हा आजार नेमका काय आहे?

आपल्या थायरॉईड, बी.पी. अश्या जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा| https://drchandrashreekulkarni.com/free-webinar/

नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या युट्युब चैनलला सब्सक्राइब करा!

TFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या